शैक्षणिक
शैक्षणिक सुविधा –
- गावांत प्राथमिक शाळा जि. प. शाळा नं. 1 मध्ये श्री. बबन भिमराव शिरतोडे हे वरिष्ठ मुख्याध्यापक काम करत आहेत. शाळेत एकुण १७७ मुले व १९ मुली अशी एकुण १९६ मुलेमुली शिक्षण घेतात. शाळेत ९ शिक्षक शिकविण्याचे काम करतात. शाळेत मुलामुलींच्या प्रमाणात मुतारी व शौचालयाची सोय आहे. पिण्याच्या पाण्याची फिल्टरची सोय करण्यात आली आहे. शाळेत वीज टी.व्ही.ची सोय करण्यात आली आहे. तसेच जि. प. शाळा नं. २ मध्ये सौ. राजश्री राजाराम पवार हया मुख्याध्यापक आहेत. या शाळेत मुलीचा पट १०० आहे. ३ शिक्षीका शिकविण्याचे काम करतात. त्याचप्रमाणे भाग शाळा चौगुलेनगर व मुकूंदनगर येथेही आहेत. प्रत्येक ठिकाणी मुलाच्या पटीप्रमाणे शिक्षक आहेत. त्याचप्रमाणे पटाप्रमाणे मुतारी व शौचालयाची सोय करण्यात आली आहे.
- गावांत श्री. दौलतगिरजी शिक्षण संस्थेचे श्री. देवेंद्रगिरीजी विद्यामंदीर बुर्ली या नावाने माध्यमिक (हायस्कुल) आहे. तेथे इ. ५ वी ते १० वी पर्यंत शिक्षणाची सोय आहे. यामध्ये मुख्याध्यापक म्हणुन सौ. मुमताज शब्बीर नदाफ या काम पाहतात.
- शाळेत ८ शिक्षक व ५ शिक्षीका २ क्लार्क व ५ शिपाई काम करतात.
- सन २००७-०८ या सालात शाळेचा निकाल ८६.७६ टक्के लागला आहे.
गावांत एकुण ७ आंगणवाडया आहेत. प्रत्येक अंगणवाडीत मुलांच्या पटाप्रमाणे मुतारी व बेबीप्लॅन शौचालयाचीसोय करण्यात आली आहे.
आंगणवाडीची माहिती
सेविकेचे नाव आंगणवाडी नं. स्वच्छतागृह स्टाईल बेबी पॅन
उत्सबी कासीम इनामदार – १७८ आहे, आहे, आहे,
कमल अंकुश षिखरे – १७९ आहे, आहे, आहे,
कांचन विठ्ठल पाटील – १८० आहे, आहे, आहे,
शारदा रामचंद्र पाटील – १८१ आहे, आहे, आहे,
नमाजबी फ. नदाफ – १८२ आहे, आहे, आहे,
बाळुताई ग. जाधव – १८३ आहे, आहे, आहे,
सुवर्णा शा. सातपुते – ३५२ आहे, आहे, आहे,