सुविधा
द्यौक्षणिक सुविधा –
- गावांत प्राथमिक शाळा जि. प. शाळा नं. 1 मध्ये श्री. बबन भिमराव शिरतोडे हे वरिष्ठ मुख्याध्यापक काम करत आहेत. शाळेत एकुण १७७ मुले व १९ मुली अशी एकुण १९६ मुलेमुली शिक्षण घेतात. शाळेत ९ शिक्षक शिकविण्याचे काम करतात. शाळेत मुलामुलीच्या प्रमाणात मुतारी व शौचालयाची सोय आहे. पिण्याच्या पाण्याची फिल्टरची सोय करण्यात आली आहे. शाळेत वीज टी.व्ही.ची सोय करण्यात आली आहे. तसेच जि. प. शा नं. २ मध्ये सौ. राजश्री राजाराम पवार हया मुख्याध्यापक आहेत. या शाळेत मुलीचा पट १०० आहे. ३ शिक्षीका शिकविण्याचे काम करतात. त्याचप्रमाणे भाग शाळा चौगुलेनगर व मुकूंदनगर येथेही आहेत. प्रत्येक ठिकाणी मुलाच्या पटीप्रमाणे शिक्षक आहेत. त्याचप्रमाणे पटाप्रमाणे मुतारी व शौचालयाची सोय करण्यात आली आहे.
- गावांत श्री. दौलतगिरजी शिक्षण संस्थेचे श्री. देवेंद्रगिरीजी विद्यामंदीर बुर्ली या नावाने माध्यमिक (हायस्कुल) आहे. तेथे इ. ५ वी ते १० वी पर्यंत शिक्षणाची सोय आहे. यामध्ये मुख्याध्यापक म्हणुन सौ. मुमताज शब्बीर नदाफ या काम पाहतात. शाळेत ८ शिक्षक व ५ शिक्षीका २ क्लार्क व ५ शिपाई काम करतात विद्यालयात १८६ मुले व १५५ मुली अषी एकुण ३४१ विद्यार्थी शिक्षण घेतात. सन २००७-०८ या सालात शाळेचा निकाल ८६.७६ टक्के लागला आहे.
- गावांत एकुण ७ आंगणवाडया आहेत. प्रत्येक अंगणवाडीत मुलाच्या पटाप्रमाणे मुतारी व बेबीप्लॅन शौचालयाची सोय करण्यात आली आहे.
आंगणवाडीची माहिती
- सेविकेचे नाव आंगणवाडी नं. स्वच्छतागृह स्टाईल बबी पॅन
- उत्सबी कासीम इनामदार – १७८, आहे, आहे, आहे
- कमल अंकुष शिखरे – १७९, आहे, आहे, आहे
- कांचन विठ्ठल पाटील – १८०, आहे, आहे, आहे
- शारदा रामचंद्र पाटील – १८१, आहे, आहे, आहे
- नमाजबी फ. नदाफ – १८२, आहे, आहे, आहे
- बाळुताई ग. जाधव – १८३, आहे, आहे, आहे
- सुवर्णा शा. सातपुते – ३५२, आहे, आहे, आहे
आरोग्य सुविधा –
- बुर्ली गांवात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे, हे सन १९६१ साली चालु झाले. या उपकेंद्रात हिवताप, माताबाल संगोपण, क्षयरोग निर्मुलन, कुटूंबनियोजन या सारखे कार्यक्रम राबविले जातात. गावांत ४ खाजगी दवाखाने आहेत.
गांवात काही भागात भुमिगत गटारे नाहीत. तसेच रुग्णवाहीका, क्रीडांगण व बागबगीचा यांचा अभाव आहे.