माहिती

जलस्त्रोत –

  • गांवाच्या दक्षिण बाजुस कृष्णा नदी वाहते. नदीतुन शेतीसाठी व लिफ्ट इरिगेशन चा वापर केला जातो त्यामुळे गांव धनधान्याने समृध्द आहे. गावांत ग्रामपंचायतीने ६ बोअरवेल व ५ खाजगी बोअरवेल आहेत. गावांत ग्रामपंचायतीने लोकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी कुंडल प्रा.पा. पु. योजनेव्दारे सहकार्य घेतले आहे.

स्वच्छता –

  • स्वच्छतेसाठी  नेहमीच गांव अग्रही असते. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात गावांने सातत्याने भाग घेतला आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने वेळोवेळी गांवांत स्वच्छता मोहित राबविली जाते.
  • नागरिकांना पिण्याच्या पाण्यातुन आजार होवु म्हणुन मेडीक्लोअर बुदल्याचे वाटप केली जाते.
  • डासाचा प्रादुर्भाव होवु नये म्हणुन गावांत गटारीवर औषध फवारणी केली जाते.
  • गावांतील मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे.
  • गावांतील उप रस्त्याचे कॉंक्रीटकरण करण्यात आले आहे व रस्त्याच्या कडेला गटारी बांधण्यात आल्या आहेत.
  • पदाप्पा मळयातील रस्त्याचे मुरमिकरण करण्यात आले आहे.