शैक्षणिक

शैक्षणिक सुविधा – 

  • गावांत प्राथमिक शाळा जि. प. शाळा नं. 1 मध्ये श्री. बबन भिमराव शिरतोडे हे वरिष्ठ मुख्याध्यापक काम करत आहेत. शाळेत एकुण १७७ मुले व १९ मुली अशी एकुण १९६ मुलेमुली शिक्षण घेतात. शाळेत ९ शिक्षक शिकविण्याचे काम करतात. शाळेत मुलामुलींच्या प्रमाणात मुतारी व शौचालयाची सोय आहे. पिण्याच्या पाण्याची फिल्टरची सोय करण्यात आली आहे. शाळेत वीज टी.व्ही.ची सोय करण्यात आली आहे. तसेच जि. प. शाळा नं. २ मध्ये सौ. राजश्री राजाराम पवार हया मुख्याध्यापक आहेत. या शाळेत मुलीचा पट १०० आहे. ३ शिक्षीका शिकविण्याचे काम करतात. त्याचप्रमाणे भाग शाळा चौगुलेनगर व मुकूंदनगर येथेही आहेत. प्रत्येक ठिकाणी मुलाच्या पटीप्रमाणे शिक्षक आहेत. त्याचप्रमाणे पटाप्रमाणे मुतारी व शौचालयाची सोय करण्यात आली आहे.


  • गावांत श्री. दौलतगिरजी शिक्षण संस्थेचे श्री. देवेंद्रगिरीजी विद्यामंदीर बुर्ली या नावाने माध्यमिक (हायस्कुल) आहे. तेथे इ. ५ वी ते १० वी पर्यंत शिक्षणाची सोय आहे. यामध्ये मुख्याध्यापक म्हणुन सौ. मुमताज शब्बीर नदाफ या काम पाहतात.

  • शाळेत ८ शिक्षक व ५ शिक्षीका २ क्लार्क व ५ शिपाई काम करतात.
  • सन २००७-०८ या सालात शाळेचा निकाल ८६.७६ टक्के लागला आहे.


गावांत एकुण ७ आंगणवाडया आहेत. प्रत्येक अंगणवाडीत मुलांच्या पटाप्रमाणे मुतारी व बेबीप्लॅन शौचालयाचीसोय करण्यात आली आहे.

आंगणवाडीची माहिती

सेविकेचे नाव                   आंगणवाडी नं.   स्वच्छतागृह    स्टाईल    बेबी पॅन     

उत्सबी कासीम इनामदार –   १७८              आहे,            आहे,      आहे,        

कमल अंकु षिखरे –         १७९              आहे,            आहे,      आहे,        

कांचन विठ्ठल पाटील –      १८०              आहे,            आहे,      आहे,        

शारदा रामचंद्र पाटील –    १८१              आहे,            आहे,       आहे,      

नमाजबी फ. नदाफ –         १८२              आहे,            आहे,       आहे,       

बाळुताई ग. जाधव –         १८३              आहे,            आहे,       आहे,       

सुवर्णा शा. सातपुते –      ३५२              आहे,            आहे,       आहे,