माझे गांव

–माझे गाव–

  • बुर्ली येथे मठाची स्थापना इ.स. १२३३ साली झालेली आहे. ती मंहत तपोनिधी श्री. शिवगिरीजी यांनी केली आहे. त्याच साली इ. स. १२३३ मध्ये त्यांचे शिष्य महंत तपोनिधी श्री. महादेवगिरीजी या दोन्ही गुरुशिष्याला इंदौर येथील बादशहा अलि आदिलशाहा यांनी इंदोरला बोलवुन घेतले. त्यांची तपष्चर्या व योगसामर्थ्य पाहुन बादशाहाने त्यांना गादी, मानपान, ताम्रपट देवुन गौरव केला. त्यांना मठाच्या खर्चासाठी जमिन इनाम दिली.
  • बुर्ली मठाची वंशपरंपरा श्री. शिवगिरीजी (१२३३), महंत तपोनिधी श्री. महादेवगिरीजी, महंत तपोनिधी श्री. पर्वतगिरीजी, मंहत तपोनिधी श्री. सिदगिरजी, मंहत तपोनिधी श्री. बालगिरजी, मंहत तपोनिधी श्री. किसनगिरजी, मंहत तेपानिधी श्री. माधवगिरजी, मंहत तपोनिधी, श्री. दौलतगिरजी, मंहत तपोनिधी श्री. सुंदरगिरजी व इ.स. १९८७ साली श्रावणवध्द व्दितीयाला मंहत श्री. सुरेंद्रगिरजी यांना गादीवर बसविले.
  • बुर्ली गांवामध्ये विविध धर्माचे लोक गुण्यागुविंदाने रहातात. गावाला हिंन्दु-मुसलमान, धनगर, जैन या धर्माचे लोक राहतात. बुर्ली गावाची खुरपी प्रसिध्द आहेत. गावांत ५ ते ६ लोहांर कुटूंबे आहेत. बुर्ली गावांमध्ये आज ६०७९ इतकी लोकसंख्या असुन ९०० कुटूंबे गुण्यागोविंदाने रहातात. बुर्ली हे गांव बैलाच्या झुंजीबद्दल महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. नामांकीत बैल पाळणारे ३ ते ४ द्योतकरी होते. नदीतील गावांच्या शर्यतीत या गावाने पहिला क्रमांक पटकविला आहे. त्या कुषल नावाडयाचे नाव आहे मारुती आंबी, त्याचप्रमाणे तासगांव व इस्लामपूर येथे १९४२ साली स्वातंत्र्यासाठी काढलेल्या मोर्चाचे नेतृत्व बुर्ली गांवाकडे होते.