धार्मिक स्थळ

धार्मिक स्थळ

बुर्ली येथे मुस्लीम समाजाचे पीर सौदागार हे मदिर हिंदू मुस्लीमांचे ऐक्याचे प्रतीक आहे. या देवालयाचा उरुस (जत्रा) हा फेब्रुवारी महिन्यात माघ शु. १३ पुष्प या दिवशी भरतो.

शैक्षणिक

शैक्षणिक

गावांत प्राथमिक शाळा जि. प. शाळा नं. 1 मध्ये श्री. बबन भिमराव शिरतोडे हे वरिष्ठ मुख्याध्यापक काम करत आहेत. शाळेत एकुण १७७ मुले व १९ मुली अशी एकुण १९६ मुलेमुली शिक्षण घेतात.

 

बुर्ली

ता. पलूस, जि.सांगली.

प्रस्तावना–

  • नावाविषयी माहितीबुर्ली येथील ग्रामपंचायत स्थापना इ.स. १९२२ साली झाली आहे. पूर्वी बुर्ली गांव थळात (एक शेतजमिनीचे नांव) होते.पाण्याच्या दुर्मिक्षामुळे गांव नंतर कृष्णाकाठी वसले. अंदाजे इ. स. १२०० च्यानंतर गावातील लोकांनी विचार करुन एक गायरान आहे. त्या ठिकाणी श्री. बंच्याप्पा देवालय बांधले. त्याची यात्रा दरवर्षी गुढीपाडवा या दिवशी आज मोठया प्रमाणात होते. गायरान बेटासारखे उंच असल्यामुळे कृष्णा नदीच्या महापूराची गावांला कसलीही भिती नव्हती. फार पूर्वी या ठिकाणी बुरड समाजाची वस्ती होती त्यावरुन गांवाला बुर्ली असे नांव पडले असी एक आख्यायिका आहे.